देवरी पोलीसांची विविध ठिकाणी कारवाई,
अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेली तंबाखुजन्य पदार्थ जप्त.
देवरी १३ नोव्हेंबर.
पोलीस प्राप्त माहिती नुसार,
मुरदोली
येथे १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३३ ते ३.३३ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी आरोपी हेमकृष्ण एकनाथ बोंबार्डे वय २५ रा. मुरदोली, ता. देवरी,जि. गोंदिया याच्या पानटपरीची तपासणी केली असता प्लास्टिक पिशवीत विविध तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
यामध्ये साई बराडी तंबाखूची एक पुडी किंमत १० रुपये, मनोहर बिडी किंमत १५ रुपये, ब्रिस्टॉल सिगारेट पाकीट किंमत ६० रुपये आणि खर्रा किंमत ३० रुपये, असा एकूण ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस शिपाई विनोदकुमार दसराम बिसेन यांची पोलीस स्टेशन देवरी येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
देवरी
येथे १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२० ते ६ वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी आरोपी आशिष त्रिलोक चव्हाण वय २६, रा. देवरी, जि. गोंदिया याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ठाकूर तंबाखूच्या दोन पुड्या किंमत २० रुपये, मनोहर बिडी किंमत २० रुपये आणि दोन सिगारेट असलेले पाकीट किंमत २० रुपये, असा एकूण किंमत ६० रुपयांचा मुद्देमाल आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई कमलकिशोर तुकाराम चव्हाण यांची पोलीस स्टेशन देवरी येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
देवरी
येथील १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या दरम्यान पोलिसांनी जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात कारवाई केली. यावेळी आरोपी साजिब अली जाकीर अली सय्यद,वय २३, रा. वॉर्ड क्रमांक १५, देवरी, जि. गोंदिया याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
यामध्ये ठाकूर तंबाखूच्या दोन पुड्या किंमत २० रुपये आणि दोन सिगारेट असलेले पाकीट किंमत २० रुपये, असा एकूण किंमत ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस शिपाई कमलकिशोर तुकाराम चव्हाण यांची पोलीस स्टेशन देवरी येथे लेखी तक्रार दाखल केली.
मरामजोब
येथे १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.४० ते ३.४० वाजताच्या दरम्यान पोलिसांनी तपासणी केली. यावेळी आरोपी नरेंद्र सदाराम शहारे वय ६३, रा. रामजटोबा, ता. देवरी, जि. गोंदिया याच्या पानटपरीत प्लास्टिक पिशवीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
पोलिसांनी ब्रिस्टॉल सिगारेट पाकीट किंमत ६० रुपये, खर्रा किंमत ३० रुपये आणि साई बराडी तंबाखू किंमत १० रुपये, असा एकूण किंमत १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई विनोदकुमार दसराम बिसेन यांची पोलीस स्टेशन देवरी येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
.
या सर्व प्रकरणांत सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ च्या कलम ६(ब) व २४ अन्वये आरोपींविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.
Tags
गुन्हेगारी