चिचगड पोलिसांची कारवाई
चिचगड १३. नोव्हेंबर
सार्वजनिक रस्त्यावर ऑटो उभा करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चिचगड पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या पोलीस माहितीनुसार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०५ ते १०.२० वाजताच्या दरम्यान चिचगड येथील बसस्टॉप चौक परिसरात आरोपी मधुकर प्रेमलाल देशमुख वय ४०, रा. बोरगाव बाजार, ता. देवरी, जि. गोंदिया याने आपल्या ताब्यातील ऑटो सार्वजनिक रस्त्याच्या मधोमध उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी पोलीस शिपाई दिलीप आनदराव भिसे (वय ३४) यांच्या लेखी तक्रारीवरून चिचगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून
या प्रकरणाचा पुढील तपास चिचगड पोलीस करीत आहेत.
Tags
गुन्हेगारी