देवरी, दि. २५ ऑक्टोबर
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुवर्णप्राशन फाऊंडेशन, दिनबंधू ग्रामीण विकास संस्था, साथ मैत्रीची साकोली आणि मित्र परिवार देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत दमा औषध वितरण शिबिरात ९७५ रुग्णांना औषधांचे वितरण करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील रुग्णांनीही शिबिराचा लाभ घेतला.
चिचगड रोडवरील आफताब मंगल कार्यालयात आयोजित शिबिराचे उद्घाटन नगरपंचायत देवरीचे नगरसेवक आफताब शेख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे होते. विशेष अतिथी म्हणून चिचगड पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्धन हेगडकर व डॉ. गुरुदेव कापगते उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. खुशाल निकोडे, धनश्री बिसेन, राजेश रामटेके, प्राचार्य डॉ. सुजित टेटे आणि रुपेश परशुरामकर उपस्थित होते.
दमा, जुनाट सर्दी, खोकला व ॲलर्जी यांसारख्या श्वसनविकारांनी त्रस्त रुग्णांना आयुर्वेदिक उपचार व औषधांचा लाभ देण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले जात आहे.
शिबिराच्या यशस्वितेसाठी विलास शिंदे, युगेश बिसेन, चेतक झंजाळ, विनोद चौधरी, शुभम वाडिभस्मे, दीपक लांजेवार, सौ. हितेश्री समरीत, सौ. कल्याणी लांजेवार, सिद्धांत शाहू, अंकुश गुप्ता, सुशील जैन, भुवनेश निर्वाण, केशव मोदी, नागेश कसोंदि, मुनेश्वर राऊत, सुरेश राठी, शोभेलाल नाईक, योगराज साखरे आणि तपेश काशिवार यांनी सहकार्य केले. दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनीही आयोजनासाठी योगदान दिले.
प्रास्ताविक सुवर्णप्राशन फाऊंडेशनचे अध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील समरीत यांनी केले तर संचालन प्रा. मधू दिहारी व उपस्थितांचे आभार चेतन उईके यांनी मानले.
Tags
गोंदिया