पुराडा येथे जनजाती गौरव दिन सोहळ्याचे आयोजन


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी तह-देवरी जि. गोंदिया (संग्रहित छायाचित्र)

१५ नोव्हेंबरला आयोजन; मंत्री, खासदार, आमदारांसह जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती

गोंदिया/मुल्ला.१३ नोव्हेंबर 

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांच्या वतीने  १५ नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिन सोहळ्याचे आयोजन पुराडा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते, तर सहउद्घाटन खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम राहणार आहेत.

विशेष उपस्थितीमध्ये राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल, राजेंद्र जैन, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, आमदार अविनाश ब्रह्मणकर, राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकचंद भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, समाजकल्याण सभापती रंजनीताई कुंभरे, पुराडा येथील सरपंच लक्ष्मीशंकर मळकाम आणि ढिवरीनटोला येथील सरपंच दिलीप जुळा उपस्थित राहणार आहेत.

मुख्य उपस्थितीमध्ये आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्त आयुषी सिंग (भा.प्र.से.) आणि गोंदिया जिल्हाधिकारी मंदार पत्की (भा.प्र.से.) सहभागी होणार असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी नितीन ईसोकर आणि मुख्याध्यापक कमल कापसे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या योगदानाचा आणि जनजाती संस्कृतीचा गौरव करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने