शंकरपटप्रेमी व नागरिकांची मोठी उपस्थिती
आमगाव. ५ नोव्हेंबर
आमगाव तालुक्यातील वळद येथे भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. या शंकरपटाचे उद्घाटन ४ नोव्हेंबर रोजी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी विभाग शिवसेना (शिंदे गट) अध्यक्ष सहसराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी उपस्थित पटप्रेमींना संबोधित केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, शिवसेना देवरी तालुकाप्रमुख जैपाल प्रधान, माजी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते राजू काळे, साखरीटोला येथील डॉ. अजय उमाटे, बब्लू बिसेन यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील विविध गावांतून बैलजोड्या घेऊन शंकरपटप्रेमी दाखल झाले होते. तसेच शर्यती अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व प्रेक्षक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील पारंपरिक शंकरपट संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने अशा आयोजनांना विशेष महत्त्व असून, मौजा वळद येथील या भव्य शंकरपटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags
गोंदिया