पाऊलझोल्यात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई


सपोनी जनार्दन हेगडकर व पोलीस कर्मचारी 

४८ देशी दारूचे पव्वे जप्त; ३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

गोंदिया/मुल्ला. दि. २ नोव्हेंबर
देवरी तालुक्यातील पाऊलझोला येथे अवैध देशी दारू विक्रीविरोधात चिचगड पोलीस स्टेशनचे सपोनि जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीकडून एकूण ३ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री ८.१५ वाजताच्या दरम्यान मौजा पाऊलझोला येथे ही कारवाई करण्यात आली. चिचगड फाट्यापासून पूर्वेस सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळी आरोपी जवळून पोलिसांना देशी दारूचे १८० मिली क्षमतेचे ४८ पव्वे आढळून आले. प्रति पव्वा ८० रुपये याप्रमाणे एकूण ३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस हवालदार नितीन शिरपूरकर यांच्या तक्रारीवरून आरोपी अमर कवडूजी मेश्राम वय ३६, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन चिचगड येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण राऊत करीत आहेत. सदरच्या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने