आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन; विविध मान्यवरांची उपस्थिती
गोंदिया/मुल्ला. १४ नोव्हेंबर.
खास रात्र-दिवसाच्या मंडईनिमित्त देवरी तालुक्यातील डोंगरगाव (सावली) येथे १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या जाहिर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राम पंचायत डोंगरगाव व भुपेश फुंडे (एलआयसी) अभिकर्ता यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, मा. दुर्गा मंदिराच्या मागे, युवा संघर्ष क्रीडा मंडळाच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम राहणार असून, पंचायत समिती देवरीचे सभापती अनिल बिसेन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे .जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती महिला व बालकल्याण समिती गोंदिया सविता पुराम तसेच पंचायत समिती सदस्य वैशाली पंधरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे.
सहउद्घाटक म्हणून डोंगरगावचे सरपंच सुरेंद्र परतेती, उपसरपंच अनिल नेवारे, पोलीस पाटील आनंद बाहेकर आणि ग्राम तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा दुर्गा मुनेश्वर, एलआयसीचे मुख्य प्रबंधक परमेश्वर दुर्गे, प्रबंधक शिशिर दातार, भुवन बोरकर, उपप्रबंधक दीपक पडोळे तसेच विकास अधिकारी अतुल बेद्रे यांची उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून, परिसरातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
प्रबोधन कार्यक्रम