कत्तलीसाठी बांधुन ठेवलेली १४ गौवंश जनावरे चिचगड पोलिसांच्या ताब्यात

घनदाट जंगलात चारा-पाण्याविना गोवंश जनावरे बांधून ठेवल्याचा प्रकार उघड

चिचगड,२९ नोव्हेंबर 
छत्तीसगड राज्याच्या लगतच्या सीमावर्ती भागात चिचगड पोलीस स्टेशन हद्दीतील घनदाट जंगल परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गौवंश जनावरांना चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चिचगड पोलिसांनी कारवाई करत तब्बल १४ गौवंश जनावरांना ताब्यात घेतले आहे.

देवरी तालुक्यातील लेंडीजोब-जपकसा, गडचिरोली जिल्ह्यातील हितापहाडी व छत्तीसगड राज्याच्या बुडीबंजारी  या सीमावर्ती परिसरात घनदाट जंगलात गौवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे चिचगड पोलिसांनी पथकासह संबंधित जंगल परिसरात २९ नोव्हेंबर रोजी सकाळी शोधमोहीम राबविली असता, एकूण १४ गोवंश जनावरे चारा व पाण्याची व्यवस्था नसताना बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून १४००००/-रुपये किमतीची सर्व गोवंश जनावरे ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी चिचगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. 

सदरची कारवाई ठाणेदार सपोनि जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वासुदेव, पोलीस हवालदार नितीन शिरपूरकर, सुधाकर शहारे तसेच पोलीस शिपाई संदीप तांदळे व दिलीप भिसे यांनी सहभाग घेतला.
 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने