पोलीस वाहन व दुचाकीची जोरदार धडक, तीघांचा जागीच मृत्यू


दांडेगाव बसस्थानकाजवळ भीषण अपघात

गोंदिया, २५ नोव्हेंबर 
गोंदिया–तिरोडा महामार्गावरील दांडेगाव बसस्थानकाजवळ २५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

 प्राथमिक माहितीनुसार, दांडेगाव बसस्थानकाजवळ रात्री सुमारे ८.३० वाजता दरम्यान पोलिस वाहन व दुचाकीची धडक झाल्याने अपघात घडला असून तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.दुचाकीस्वार मृतांमध्ये खडबंदा येथील रितेश बावनकर, शिवप्रसाद कांबळे, आणि तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील कार्तिक बिसेन यांचा समावेश आहे. या घटनेमुळे दांडेगाव, खडबंदा आणि सेजगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.या दुर्घटनेमुळे मृतकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. 

 दरम्यान, अपघातासंदर्भात पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून,या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने