लोहारा येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ


 आमदार संजय पुराम यांच्या हस्ते उद्घाटन, खरीप हंगाम धान खरेदीला प्रारंभ
 
लोहारा(गोंदिया) १५ नोव्हेंबर.
देवरी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, लोहारा यांच्या वतीने खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्राचा उद्घाटन सोहळा १३ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महामंडळाचे संचालक भरतजी दुधनांग होते. यावेळी नाशिक महामंडळाचे संचालक रमेश ताराम, माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था लोहारा अध्यक्ष राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरीप हंगामातील धान खरेदीसाठी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना आपले धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने धान खरेदी केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने