मॉ.धुकेश्वरी मंदिरात चोरी


देवरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

देवरी १५ नोव्हेंबर, 
 शहरातील मॉ.धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दानपेटी फोडत त्यातील अंदाजे १० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशील पितांबर शेंदरे वय ६२ वर्षे, रा.वॉर्ड क्रमांक ०१, देवरी, ता. देवरी, जि. गोंदिया यांच्या तक्रारीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने देवरी येथील मॉ.धुकेश्वरी सार्वजनिक मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटी मंदिराबाहेर आणून ती फोडली व त्यामधील अंदाजे १० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी  देवरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३१ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वनारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार बडोले करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने