मुल्ला येथे अज्ञात चोरट्यांचा डल्ला; शेतातील साहित्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
मुल्ला (गोंदिया) १५ नोव्हेंबर.
देवरी तालुक्यातील मुल्ला येथील चैतन्य भोजराज हेमने यांच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेला मोटारपंप १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतात सध्या घराचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडल्याचे बोलले जाते.
या चोरीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. शेतातील साहित्य चोरीच्या घटनांना आळा बसावा आणि संबंधितांनी या घटनेची दखल घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tags
गुन्हेगारी