विजेचा धक्क्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू



पंखा दुरुस्त करताना निलज येथील दुर्दैवी घटना

अर्जुनी-मोर. 
अर्जुनी-मोर तालुक्यातील निलज येथे घरगुती इलेक्ट्रिक पंखा दुरुस्त करीत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने ४० वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुकेश मन्साराम कोल्हे रा. निलज, ता. अर्जुनी-मोर, जि. गोंदिया असे मृत इसमाचे चे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुकेश कोल्हे हे घरगुती इलेक्ट्रिक पंख्याची दुरुस्ती करीत असताना अचानक त्यांच्या डाव्या हाताला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत ते गंभीररीत्या भाजले गेले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी-मोर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने