नवाटोला चेकपोस्ट जवळ २.९५ किलो गांजा जप्त; तरुणाला अटक


१ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

गोंदिया/मुल्ला, १६ नोव्हेंबर 
 देवरी पोलिस स्टेशन हद्दीत अमली पदार्थांविरोधात कारवाई करत पोलिसांनी नवाटोला वनविभागाच्या चेकपोस्टजवळ २.९५ किलो ओलसर गांजासदूश पदार्थ जप्त केला. या कारवाईत १ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, विशाल निरंजन पाटील (वय २८) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रायपूर-नागपूर मार्गावर संशयिताच्या ट्रॅव्हल्स बॅगेची राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली असता, दोन पुडक्यांमध्ये हिरवट रंगाचा गांजासदूश पदार्थ आढळून आला. त्याचे वजन १.४० किलो व १.५५ किलो असे एकूण २.९५ किलो भरले. जप्त पदार्थाची किंमत १ लाख ४ हजार ७५० रुपये, तर बॅगेची किंमत २ हजार रुपये आहे.

याप्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब) व २०(बी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून नागपूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम पुढील तपास करीत आहेत.
सदर कारवाईत पोलीस हवालदार करंजेकर,दारासिंग पटेल,चा.पोह.पारधी,पोना.कांबे,जांगळे,पोशि.देवेंद्र नेताम,विशाल खांडेकर पोलीस कर्मचारी सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने