मद्यपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल, महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव कॅम्प दुग्गीपार ची कारवाई

दुग्गीपार पोलिसांत गुन्हा दाखल

गोंदिया,१८ नोव्हेंबर 
कोहमारा ते नवेगावबांध मार्गावर दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्या मुकेश रोशन कांडेकर वय ३७, रा. खंडाळा सावराबांध, ता. साकोली, जि. भंडारा याच्याविरुद्ध दुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३५ वाजताच्या सुमारास आरोपी हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकी वेड्यावाकड्या पद्धतीने चालविताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता, मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव कॅम्प दुग्गीपार चे पो.उपनिरीक्षक रंजीत मट्टामी यांच्या तक्रारीवरून, मोटार वाहन कायद्यान्वये दुग्गीपार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वाढिवे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने