गोंदियात भ्रष्टाचाराविरोधात ‘दक्षता’चा जागर!


लाच मागणाऱ्यांविरुद्ध तक्रारीचे आवाहन

गोंदिया, २८ऑक्टोबर  
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्यावतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ अशी आहे.
या सप्ताहांतर्गत बसस्थानक, रेल्वे स्थानक, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरोधी जनजागृती केली जाणार आहे. ग्रामीण भागात ग्रामभेटी, पत्रकवाटप आणि पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यात येणार आहे.
शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने