मोबाईल मूळ मालकांना परत
गोंदिया शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी;गोंदिया/मुल्ला २५ ऑक्टोंबर.
गोंदिया शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरविलेले व चोरीचे ५० मोबाईल शोधून काढत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. जवळपास २० लाख रुपये किमतीचे हे मोबाईल २४ ऑक्टोबर रोजी मूळ मालकांना परत करण्यात आले.
गेल्या चार महिन्यांत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी व हरविल्याच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी या तक्रारींची दखल घेत तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखा व डीबी पथकाने केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) प्रणालीचा वापर करून मोबाईलचा शोध घेतला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Tags
गोंदिया/मुल्ला