चिचगड पोलिसांकडून आरोपीला देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यांतून हद्दपार
गोंदिया/मुल्ला
अवैध दारू विक्रीच्या प्रकरणातील आरोपीविरुद्ध पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. जगदीश डोमा करांडे वय ३३ वर्षे, रा. सिंधीबिरी असे हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अवैध दारू विक्रीच्या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपीला देवरी, आमगाव व सालेकसा या तीन तालुक्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्याबाबतचे आदेश पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यानुसार चिचगड पोलिसांनी आरोपीवर हद्दपारीचा आदेश बजावला. त्यानंतर त्याला संबंधित तालुक्यांच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले.
अवैध दारू विक्रीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून, या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पोलीस ठाणे चिचगड यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.
Tags
गुन्हेगारी