आमगाव/मुल्ला २३आक्टोंबर.
आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे विहिरीच्या पाण्यात बुडून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ममता गजेंद्र राऊत वय ४५, रा.कट्टीपार, ता.आमगाव, जि. गोंदिया असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममता गजेंद्र राऊत यांचा मृतदेह कट्टीपार येथील विहिरीच्या पाण्यात आढळून आला.या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात २२ आक्टोंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास आमगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलकंठ कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साजिद शेख करीत आहेत.
Tags
दुःखद वार्ता
