चिचगड पोलिसांकडून १४ गौवंश ताब्यात


जपकसा–लेंडीजोब जंगल परिसरातील कारवाई; गुन्हा दाखल

गोंदिया/मुल्ला.  २४ ऑक्टोबर 

छत्तीसगड सीमावर्ती भागातील चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जपकसा–लेंडीजोब जंगल परिसरात कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने गौवंशाची जनावरे बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवून १४ गौवंशाची जनावरे ताब्यात घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, जंगल परिसरात जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. माहिती मिळताच चिचगड पोलिसांच्या पथकाने परिसरात शोध घेतला. यावेळी १४ गौवंशाची जनावरे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून जनावरे ताब्यात घेतली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक वासुदेव, सहाय्यक फौजदार ज्ञानिराम राऊत, पोलीस हवालदार गाते व शहारे तसेच पोलीस शिपाई भिसे यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने