मद्यपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल, चिचगड पोलिसांची कारवाई


चिचगड, २१ नोव्हेंबर 
दारूच्या नशेत दुचाकी  चालविणाऱ्या इसमाविरुद्ध चिचगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेजराम कोंडू नेवारे,वय ५२, रा.मोहगाटा. पो.शेंडा ता.सडकअर्जुनी असे आरोपी दुचाकी चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ५.५० वाजताच्या दरम्यान चिचगड येथील टी-पॉइंट परिसरात संबंधित इसम आपल्या ताब्यातील मोटारसायकल दारूच्या नशेत चालवित असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता, त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले.
या प्रकरणी पोलीस हवालदार विनोद रामचंद्र कुंभरे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून चिचगड पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेगडकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार विजय गावड करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने