५ लाख रुपये खर्चातून ३००० लिटर क्षमतेची सौरपंप योजना
देवरी, २१ नोव्हेंबर
पंचायत समिती देवरी अंतर्गत ग्रामपंचायत चिचेवाडा येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ५ लाख रुपये खर्चाच्या ३००० लिटर क्षमतेच्या सौरपंप योजनेचे भूमिपूजन २१ नोव्हेंबर रोजी पं.स. सभापती अनिलकुमार बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले. सौरऊर्जेवर आधारित या योजनेमुळे गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेला हातभार लागणार असून, ग्रामस्थांना या सुविधेचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य श्यामकला गावड, सरपंच लता गावड, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गावड, ग्रामपंचायत सदस्य उषा गावड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. गावाच्या पाणीपुरवठा सुविधेत भर घालणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले
Tags
ग्रामीण विकास