Maharashtra Chetna
गोंदिया, २१ ऑक्टोबर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरातील भारतीय ज्ञानपीठ स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळविली आहे. आरोषी काशीनाथ ताराम आणि निश्चल सुरेश लिल्हारे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया यांच्या वतीने विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. भंडारा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय ज्ञानपीठ स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटातून आरोषी काशीनाथ ताराम, तर १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून निश्चल सुरेश लिल्हारे यांची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान जालना येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या यशाबद्दल खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शाळेचे संस्थापक जे. पी. लिल्हारे, प्राचार्या पूजा लिल्हारे, क्रीडाशिक्षक उज्ज्वल बानासुरे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना दिले आहे.
...
Tags
Gondiya